Sunday, November 23, 2014

चला तर , जरा बायकोच्या नजरेतून आपण जगाला पाहूया …
जगातील सगळ्यात उत्कृष्ट माणूस - तिचे पप्पा .
जगातील सगळ्यात प्रेमळ स्त्री- तिची मम्मी
जगातील सगळ्यात हुशार स्त्री -ती स्वतः
जगातील सगळ्यात दुखी नवरा - तिचा भाऊ
जगातील सगळ्यात मोठी शत्रू - तिची नणंद
जगातील सगळ्यात सुंदर पुरुष - तिचा मुलगा
जगातील सगळ्यात नशीबवान नवरा -तिच्या बहिणीचा नवरा
जगातील सगळ्यात अडाणी स्त्री -तिची सासू
आणि जगातील सगळ्यात खराब , कामचोर , स्वार्थी , खोटारडा , कंजूस , बेकार माणूस कोण....?
आता हे देखील सांगायला पाहिजे का...!!!???

read

एकदा एक संत देवाबरोबर बोलत होता.....त्याने देवाला स्वर्ग आणि नरक मधला फरक विचारला......
“ये तुला प्रत्यक्ष दाखवतो....” देव म्हणाला...
त्याने संताला दोन दरवाजा जवळ नेले.....त्याने पहिलं दरवाजा ढकलला.....एका मोठ्या खोलीत प्रवेश केला....एका मोठ्या गोल टेबलाभोवती अनेक माणसे बसली होती....टेबलाचा मध्यावर रुचकर खिरीने भरलेले मोठे भांडे ठेवलेलं होत.....त्या खिरीचा सुगंधाने त्या संत माणसाचा तोंडाला देखील पाणी सुटलं होत.....पण मग त्याचा लक्षात आल की ती माणसे उपाशी भुकेली दिसत होती.....त्यांचा हाताला लांब दांड्यांचे चमचे बांधलेले होते.....त्यांना हात लांब करून खीर खाता येत नव्हती.......कारण चमचाचा दांडा हातपेक्षा लांब होता.....त्यांचा यातनांना अंत नव्हता.....भुकेचा भरीला खिरीचा सुवासाने त्यांना वेड लावले होते....
“हा नरक आहे...”देव म्हणाला....
“चल आता स्वर्ग पाहू....”ते दुसर्या. दारातून आत आले....ती खोली सुद्धा हुबेहूब पहिल्या खोली सारखीच होती....तेच टेबल तेच खिरीच भांड.....भोवताली माणस आणि हाताला बांधलेले चमचे.....पण ही सगळी माणसे तृप्त...समाधानी व आनंदी दिसत होती......आपापसात हसत आनंदाने राहत होती.....
“मला कळत नाहीये.....” संत म्हणाला,”सारख्याच खोल्या,टेबल,भांडी,खीर आणि तेच लांब दांड्यांचे चमचे,मग ही माणसे खाऊन तृप्त आणि ती उपाशी आणि दुखी का...??
“सोप आहे...”देव म्हणाला
“या खोलीतील माणसे एकमेकांना भरवायला शिकली आहेत....हावरट मनुष्य फक्त स्वतचा विचार करतो.....”
गोष्ट संपली.........
खरच....!! कुणीतरी हे म्हटलच आहे की,तुम्ही दुसर्यामला त्याचा इच्छा पूर्ण करायला मदत करा म्हणजे आपोआपच तुमची स्वप्न सुद्धा पूर्ण होतील......जेते आणि जेत्यांचा संघ हा एकमेकाला भरवणार्यार समुहा सारखा असतो.....स्वत:चा गरजांपेक्षा इतरांचा इच्छा व आवश्यकतांना अधिक मान किंवा प्राधान्यक्रम देणे हे समूह यशाचे गुपित आहे.....
यात आनंदाची बातमी अशी की हा स्वर्ग किंवा नरक निर्माण करणे आपल्याच हातात असते....खोली,खीर,टेबल आणि चमचा.......सगळ्यांना समान संधी मिळते....स्वता:च खात बसायच की दुसर्यांीना पण भरवायच ते तुमचावर अवलंबून आहे.....म्हणूनच आज एक स्वार्थी गोष्ट कराच....